Nashik
08048030543
+917796000274

Old Age Home Nashik

✨ अंधाराकडून प्रकाशाकडे... ✨आषाढ महिन्याची सांगता आणि पवित्र श्रावणाच्या आगमनाची चाहूल देणारा सण म्हणजे 'दीप अमावस्या'! 🪔 हा दिवस केवळ घरातील दिव्यांची पूजा करण्याचा नाही, तर आपल्या मनातील अज्ञान, उदासिनता आणि निराशेचा अंधार दूर करून आशेचा नवा प्रकाश पसरवण्याचा संदेश देणारा उत्सव आहे. 🌟 आपल्या संस्कृतीत दिव्याला मांगल्याचे प्रतीक मानले गेले आहे. 🕊️देशभरात लोक आपापल्या घरात दिवे लावून हा सण साजरा करत असताना, आम्ही हाच प्रकाशाचा आनंद आमच्या आनंदालयातिल आजी-आजोबांच्या आयुष्यात घेऊन आलो. 🥰 आयुष्याची संध्याकाळ अनुभवत असलेल्या या माऊलींच्या जीवनातील एकाकीपणा दूर करून, त्यांच्या चेहऱ्यावर सुखाचे आणि समाधानाचे दिवे प्रज्वलित करणे, हाच या आनंदालयचा मुख्य उद्देश आहे . ❤️👵👴
 2026-08-12T11:17:22

Keywords