आनंदालय' वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण रंगवण्यासाठी आणि त्यांना दैनंदिन दिनचर्येतून एक सुंदर विरंगुळा देण्याच्या उद्देशाने नुकतेच एक दिवसीय सहलीचे आणि 'मिसळ पार्टी'चे अतिशय उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
या सहलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आनंदालयातील वृद्धांनी यामध्ये अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने सहभाग घेतला.
निसर्गरम्य वातावरण पाहून सर्वजण सुखावले.
दुपारच्या सत्रात खास बेत असलेल्या झणझणीत आणि चविष्ट मिसाळीचा आस्वाद सर्वांनी घेतला.
नेहमीच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळा आणि जिभेची चव बदलणारा हा बेत सर्वांनाच खूप आवडला.
मिसळ खाताना जुन्या आठवणींना उजाळा देत हसून-खेळून गप्पा मारण्यात सर्वजण रमून गेले होते.
आनंदालयातील सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येऊन घेतलेला हा सहभाग त्यांच्यातील कौटुंबिक बंध अधिक दृढ करणारा ठरला.
सहलीदरम्यान ज्येष्ठ सदस्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “वृद्धाश्रमाबाहेर पडून अशा प्रकारे सर्वांसोबत निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे आणि मिसळ पार्टीचा आनंद घेणे, हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. यामुळे आम्हाला एक नवी ऊर्जा मिळाली आहे.“
ही सहल यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे आणि आयोजकांचे आनंदालयाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.